वाचाल तर वाचाल !

वाचन संस्कृती (Reading Culture)

आपल्यात वाचन संस्कृती (reading culture) तर बाबासाहेबांनीच रुजवलं. प्रत्येक फोटोत, पुतळ्यात बाबासाहेबांना हातात पुस्तक घेऊनच आपण बघत आलोय. भारताच्या कोणत्याच iconic figure ला हे गाठता आलं नाही. बाबासाहेबांची प्रतिमाच वाचक व अभ्यासक म्हणून एवढी यशस्वी उभी राहिली की त्यांचा अनुयायी म्हणून घेणाऱ्याला पहिला प्रश्न तु किती वाचलं, काय वाचलं इथुन सुरु होतो. कोणत्याच राष्ट्रीय नेत्यांच्या अनुयायांना शिक्षण वाचणाची अट नाही जी बाबासाहेबांच्या अनुयायांना आहे. आणि हे प्रचंड सकारात्मक प्रेरणादायी आहे. करिअर तुम्ही काहीही निवडा पण आपल्या आई वडिलांकडून बाबासाहेबां सारखं शिक हे पहिलं ऐकवलं जातं. मानव मुक्तीच्या कल्पना व मानव मुक्तीची हर एक शक्यता ज्ञान, शिक्षण वाचणातुनच जाते, तसं ते सिद्ध ही आहे. भारतात वाचन संस्कृतीचा जनक, भव्य प्रेरणा निर्माण करणारा निर्माता म्हणून बाबासाहेब एक निर्विवाद आदर्श आहे! त्यांनी तमाम लाखो लोकांत शिक्षणाची व वाचनाची गोडी निर्माण केली. भारत स्वांतत्र्य झाला तरी शिक्षणाचं प्रमाण शोषित वर्गात आज जेवढं आहे तेवढं झालं नसतं जर बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व दिलं नसतं. भारत सरकारच्या प्रयत्नाविनाही साक्षरता, वाचनाला बुस्टर डोस शिका संघटित व्हा संघर्ष करा या स्लोगनने दिला तेवढा तो शंभराच्या एका अंश इतकाही देशाच्या सरकारला देता आला नसता. बाबासाहेबांचा वैयक्तिक ग्रंथ साठा ३० हजार + पुस्तकांचा होता, आपण तिशी पस्तीशी ओलांडुन १००० पर्यत मजल मारता दमछाक होतो. बाबासाहेबांच्या ६२ वर्षा नंतरही थोडे प्रिवेलज येऊनही आपण तो टप्पा पार करु शकलो नाही. ही आयकॉनिक फिगर किती लायक आहे यावरून लक्षात येतं. वाचनाचं औचित्य वाचन दिनापुरतं नसावं. रोज वाचावं खुप वेळ मिळत नसेल तर १०-२०-३० पाने जी जेवढी शक्य ती वाचावीत. (Date : 23 Apr 2023)

Rahul Pagare

8/31/20261 min read

Adinna Publishing House

Contact us

support@adinnabook.com
8600244361

Address

Adinna Publishing House

C-4/12, Sara Elite

C.Sambhajinagar - 431136
Maharashtra

Follow us