बुद्ध आणि क्रांतीबा फुले (Buddha ani Krantiba Phule)
बुद्ध आणि क्रांतीबा फुले! अंगुलीमाल ही बुद्धावर शस्र घेऊन आलेला, पण बुद्ध त्याला बुद्ध निशस्र असुनही भयभीत वाटला नाही, किंवा प्रतिकारासाठी सज्ज होतोय, सावधान होतोय असंही बुद्धात त्याला काही दिसलं नाही. आपल्याच खुंखारपणावर तेव्हा कदाचित त्यालाही थोडी शंका येऊन थोडा कोड्यात पडून शांत झाला असेल आणि बुद्धाच्या धीरगंभीर सुबोध वाणीने प्रभावित होऊन, प्रश्नोत्तरातुन चिंतन करत त्याला त्याचं माणुसपण गवसलं असेल. पुढे हाच खुखांर हिंसक अंगुलीमाल चरत भिक्खुवे चारिकम बहुजण हिताय बहुजन सुखाय उपदेशाने बौद्ध भिक्खू बनुन अर्हत ही झाला. असेच जोतीराव फुले यांच्या बाबतीत ही घडलं. मुली व अस्पृश्यांसाठी शाळा काढली, शिक्षणातुन फक्त अक्षर ओळख नाही तर समाजभान त्यांच्यात निर्माण करत असता त्यांच्या या कार्याला विरोध म्हणून बामणांनी दोन मारेकरी पाठवले होते. रामोशी रोडे आणि धोंडीराम कुंभार हे ते दोघे मारेकरी होते. पण जोतिबा फुले यांना चाहुल लागुन सावधान झाले झटापटीत जे जोतिबा फुले जे काही सांगू शकले, प्रबोधन त्यात या दोघांना ही त्याचं माणुसपण गवसलं. क्रांतीबा तसे धडधाकट आणि कुस्तीत शरीर बनवलेले होते. यांच्यातील संवादाने मारेकऱ्यांना पश्चात्ताप झाला, चुक लक्षात आली. जोतिबा फुलेनी बदलाची, प्रतिशोधाची भावना घेतली नाही. या दोन्ही शरणार्थीना योग्य ते प्रबोधन करुन त्यांच्या कडुन उचित कार्य घडुन आणलं. रामोशी रोडे नंतर क्रांतीबाचा अंगरक्षक बनले, फुलेचे कार्य खड्या आवाजात गाऊ लागला. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात त्यांची सुन सावित्रीबाई रोडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाचे अधिवेशन सुद्धा पार पडल्याचा उल्लेख आहे. दुसरे मारेकरी धोंडीराम कुंभार सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ बनले. क्रांतीबाचे विचार समाजात पेरत होते. फुलेनी यांना काशीला विद्याभ्यासाठी काशीला पाठवले होते. याच धोंडीरामानी १२ फ्रेबुवारी १८८४ साली शृगांरी येथील शंकाराचार्याला वाद विवादात हरवले होते. असल्या भयाण काळात एखाद्या शुद्रांनी बामणाला, कोण्या शंकाराचार्याला वादविवादात हरवनं ब्राह्मणी वर्चस्ववादाला जोतिबा फुले यांच्याकडून दिलेले मोठं कडुन आव्हाण होतं. हा संदर्भ आज वाचताना तितका महत्वाचा वाटणार नाही पण १८८० काळ डोळ्या समोर ठेऊन लक्षात घ्या हे किती आव्हानात्मक होतं. जोतिबा लिखित "गुलामगिरी" हा ग्रंथ हा याच धोंडीरामाला कदाचित डोळ्यासमोर लिहला असावा. शिक्षणात living experience कसं वापरायचं यात जोतिबा माहीर होते. बुद्ध आणि क्रांतीबा फुले यांच्यातील हे जीवण प्रसंग किती साम्य दर्शवणारे आणि सारखेच प्रेरणादायी आहे. (Date : 06.04.2024)
सामाजिक
Rahul Pagare
9/1/20261 min read


My post content
