वाचाल तर वाचाल !

सावित्रीमाईच्या कार्याला, धैर्याला, क्रांती विचाराला त्रिवार अभिवादन

मागच्या सहा महिने मी कुठे गायब होतो तर मी मागचे सहा महिने 1827 ते 1897 या चित्तथरारक काळात होतो. साऊ जोति ला वाचनं समजणं ते काय जगले असतील याची कल्पना करणं म्हणजे स्वतला उपकृत करुन घेणं आहे. सावित्रीमाईवर काही लिखाण व्हावं हे माझं अक्षरशः स्वप्न होतं. सावित्रीमाई बद्दल आपल्या discourse मधे फक्त पहिली मुलीची शाळा, दगड व शेन फेकले, दोन कवितासंग्रह आणि अंतिमतः प्लेगच्या साथीने निधन एवढंच आहे. एक झुंझार क्रांतीज्रोती एवढीच आपल्या discourse मधे असणं खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. पुढच्या वर्षी जोतिबांची 200 वी जयंती आपण साजरी करणार आहोत, या 200 वर्षात त्यांचा लढा पुढे किती आपण आणला हे तर राहुच द्या पण आपण दोनशे वर्षात त्यांच्या बद्दल काय वाचलं? त्यांना काय समजून घेतलं? याच गोष्टी खरं तर प्रश्नात्मक आहे. जोतिबा फुले यांनी उद्योग सुरू केला होता हे आपण ऐकलं वाचलं असेल पण साऊने सुद्धा तिचा उद्योग सुरू केला होता हे कदाचित वाचण्यात आले नसेल. साऊ फक्त भारताची पहिला महिला शिक्षिका मुख्याध्यापिकाच नव्हती तर भारताची पहिली महिला संघटना पण वयाच्या 21 व्या तिने स्थापन केली होती. ती entrepreneur होती, कुशल संघटक होती, संपादक, वक्ता होती, शिवाय कोणतही राजकीय प्रविलेज नसलेली आधुनिक भारतातील पहिली महिला व पुरुष संघटनेची नेतृत्व करणारी, क्लासिकल लीडर होती..याशिवाय साऊ जोति एक पती पत्नी म्हणून विद्रोह करताना, क्रांतीच्या रणभूमीवर उभे ठाकले असताना पण आपल्या प्रेमाला ज्या पद्धतीने त्यांनी निभावलं ते अतुलनीय उदाहरण आहे. असे कित्येक गुण तिच्या व्यक्तीमत्वात असताना संपूर्ण सावित्रीमाई कधी आपल्या डिस्कोर्स मधे आलीच नाही. तिच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकण्यासाठी comic book स्वरुपात लवकरच पुस्तक घेऊन येत आहोत. लहान वयातच आपल्या मुलांना आपल्या उद्धारकर्त्याचे व्यक्तिमत्व वाचुन त्याचे अनुकरण करता यावे हा हेतु समोर ठेऊन मराठी व इंग्रजी कॉमिक्स घेऊन येत आहे.... सावित्रीमाईच्या कार्याला, धैर्याला, क्रांती विचाराला त्रिवार अभिवादन❤ (Date 03.01.2026)

Rahul Pagare

8/31/20261 min read

Get in touch

Adinna Publishing House

Contact us

support@adinnabook.com
8600244361

Address

Adinna Publishing House

C-4/12, Sara Elite

C.Sambhajinagar - 431136
Maharashtra

Follow us